breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी बोर्डाचा अर्ज भरण्यास 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 25 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील. बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आज 11 जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दहावी बोर्ड परिक्षेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी चिंतेत होते. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक, मुंबई मुख्यध्यापक संघटना यांनी बोर्डाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.