breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’चा राडारोडा; एचए मैदान बनतेय डपिंग ग्राऊंड

  • रुग्णालय पार्किंगचा राडारोडा ठेकेदार टाकतोय एचए ग्राऊंडवर

पिंपरी ( महा ई न्यूज ) – संत तुकारामनगर येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचे मैदान हे नागरिकांसाठी डपिंग ग्राॅऊंड बनले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागातून रात्री-अपरात्री राडारोडा, कचरा, मयत जनावरे, भटकी कुत्री मैदानावर आणून टाकले जात आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे दुचाकी पार्किंग पाडण्यात आले आहे. त्या जागेवर नव्याने दुचारी, फोर व्हीलर पार्किंग व्यवस्था, रहिवाशी डाॅक्टरांचे निवासस्थान, रुग्ण नातेवाईकांची बैठक व्यवस्था, उपहारगृह अशी सात मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च महापालिका करीत आहे.

दरम्यान, वायसीएम रुग्णालयाचे दुचाकी पार्किंग पाडण्यात आले आहे. त्या ठिकाणचा सगळा राडारोडा पार्किंगचे काम घेतलेले मे. एस.एस.साठे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून एच.ए.कंपनीच्या मैदानावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे एचए कंपनीचे मैदान डपिंग ग्राऊंड बनले आहे. स्थानिक नागरिक अथवा बाहेरुन आलेल्यांनी त्या मैदानावर राडारोडा टाकल्यास महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. परंतू, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या पार्किंगचा सगळा राडारोडा त्या ठिकाणी टाकल्याने संपुर्ण मैदान व्यापले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर महापालिका स्थापत्य विभाग कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत संबंधित ठेकेदार एस.एस.साठे म्हणाले की, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता भंडारे यांनीच आम्हाला एचए ग्राऊंडवर राडारोडा टाकण्यास सांगितले होते. त्यानूसार दहा ते पंधरा डंपर आम्ही राडारोडा टाकला आहे. कोणाची तक्रार असेल तर तो राडारोडा आम्ही उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा राडारोडा टाकणे चुकीचे…

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय पार्किंगचा राडारोडा हा एचए मैदानावर टाकणे चुकीचे आहे. याविषयी संबंधित अधिका-यांना माहिती घेण्यास सांगतो. सदरील घटनेत तथ्य आढळल्यास त्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. असे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button