वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स; 11 जानेवारीला चौकशी होणार
![Wife of Sanjay Raut Varsha Raut has got new summon by ED interrogation is on 11 january](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/varsha-raut.jpg)
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आणखी एक धक्का बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) ईडीने वर्षा राऊत यांना आणखी एक समन्स पाठवले आहे. पुन्हा चौकशी होणार आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारीला पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
यापूर्वी 4 जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. माधुरी राऊतांकडून घेतलेल्या कर्जातून वर्षा राऊतांनी यांनी फ्लॅट विकत घेतला होता. आता ईडीकडून वर्षा राऊत यांनी विकत घेतलेल्या फ्लॅटची आणि अवनी कन्स्ट्रक्शनमधील व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.