Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलादपूर घाटात कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली

सातारा –  रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली आहे, प्रवाशांच्या बचावासाठी सगळी यंत्रणा पोलादपूरकडे रवाना झाले आहे. पोलीसही या ठिकाणी रवाना झाले आहेत. या बसमध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे  कर्मचारी पिकनिकसाठी निघाले होते. बस सकाळी १०.३० च्या दरम्यान दरीत कोसळली अशी माहिती समोर आली.

४० कर्मचारी महाबळेश्वरच्या दिशेने निघाली होती. आता या सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दापोली कृषी विद्यापीठाची बस होती अशी माहिती समोर येते आहे. रायगडच्या दाभळी टोक इथे ही घटना घडली असून, या बसमध्ये ४० कर्मचारी पिकनिकला चालले होते. कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तसेच सकाळपासून या दिशेने बचाव पथके रवाना झाली आहेत. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असेही समजते आहे.

महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी  विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस प्रतापगड घाटात सकाळी कोसळली. प्राथमिक माहितीनुसार तीस जण जखमी झाले असून यामध्ये कोणी मृत झाल्याची माहीती मिळू शकत नाही. पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button