महापाैर राहूल जाधव जाणार युरोप दाै-यावर
आर्मेनिया देशात भरणार महापाैर परिषद
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव पाच दिवसांच्या विदेश दौ-यावर जाणार आहेत. युरोपमधील आर्मेनिया या देशात होणा-या आंतराष्ट्रीय महापौर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
राहूल जाधव यांची नुकतीच महापौरपदी वर्णी लागली आहे. त्यानंतर काही दिवसांतच राहूल जाधव विदेश दौ-यावर निघाले आहेत. युरोप खंडातील आर्मेनिया देशातील
येरेव्हान येथे 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत आंतराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचलडचे महापौर म्हणून निमंत्रण मिळाले आहे.
या निमंत्रणानुसार राहूल जाधव 7 ते 11 सप्टेंबर या पाच दिवसांच्या विदेश दौ-यावर जाणार आहेत. या दौ-याचा खर्च आंतराष्ट्रीय महापौर परिषदेच्या आयोजकांकडून केला जाणार आहे. मात्र, दौ-यासाठी महापौर जाधव यांना मोबाईलविषयक सुविधा पुरविण्याचा खर्च पालिका करणार असून त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.