Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेत अनेकजण तळ ठोकून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/PCMC-BUILDING.jpg)
पिंपरी – महापालिका प्रशासनातील 223 अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, गेल्या सात वर्षात एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या सुमारे 1700 अधिकारी, कर्मचा-यांची आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यांच्या बदल्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रजेवर जाण्यापूर्वी 223 अधिकारी, कर्मचा-यांची उचलबांगडी करण्यात आली. परंतू, काही अधिकारी व कर्मचारीच्या बदली धोरणानुसार प्रशासन विभागाकडून आणखी बदल्या होवू शकतात. त्यानूसार वैभव तापकीर यांनी महापालिका प्रशासनाकडे एकाच विभागात ७ वर्षांपासून अधिक काळ असलेल्या कर्मचा-यांची माहिती मागविली होती. त्यामध्ये 46 विभागामध्ये एकूण 1767 अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाच्या माहितीत सहशहर अभियंता कार्यकारी अभियंता, उपअभियंता, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, नगररचनाकार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक यांसारख्या पदांवर अनेक वर्षे खुर्ची उबविणारे अधिकारी आहेत. या व्यतिरिक्त प्राधान्याने प्रशासनाच्या माहितीत लिपिक, वाहन चालक 7 वर्षांपासून ते 15 वर्षांपर्यंत एका विभागात असल्याचे समोर आले. त्यापैकी अनेक लिपिक निविदाप्रक्रिया व इतर महत्त्वाच्या जबाबदा-यांमुळे ठाण मांडून आहेत. तर, 28 वर्षांपासून एकाच शाळेत असणारे शिक्षक, 26 वर्षे एकाच रुग्णालयात असलेले वॉर्डबॉय, 4 वर्षे एका विभागात असलेले अनेक शिपाई, 31 वर्षे सफाई कामगार, 23 वर्षे आया असे कर्मचारी आहेत.