भारत आणि इंडोनेशियात परंपरा आणि लोकशाही मुल्यांमध्येही समानता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/namo-indonesia.jpg)
जकार्ता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इंडोनेशियामधील विशेष संबंध विशद केले आणि नवी दिल्लीत यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची आठवण सांगितली. ज्यात इंडोनेशियासह 10 आसियान देशांचे नेते उपस्थित होते. 1950 सालीही नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, या योगा
इंडोनेशियातील भारतीय समुदायातील सदस्य हे इंडोनेशियाचे स्वाभिमानी नागरिक आहेत. मात्र, आपल्या भारतीय मुळांशी संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. गेल्या 4 वर्षात भारतात अभूतपूर्व परिवर्तन झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्या संदर्भात बोलताना त्यांनी थेट परदेशी गुंतवणूक, मुक्त भारतीय अर्थव्यवस्था, व्यापार सुलभता आणि भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता यांचा उल्लेख केला.
दोन्ही देशांना त्यांच्या लोकशाही मूल्य आणि वैविध्याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. उभय देशांमधील सांस्कृतिक संबंध अधोरेखित करतांना त्यांनी बाली-जत्रा आणि खाद्य पदार्थ आणि भाषेतील साम्य ही उदाहरणे दिली. तत्पूर्वी आपण आणि राष्ट्रपती विदोदोनी संयुक्तपणे पतंग प्रदर्शनाचे उद्घाटन केले ज्यात रामायण आणि महाभारतातील संकल्पनांचा समावेश होता, असे ते म्हणाले.
भारतातील विकासाबाबत बोलतांना ते म्हणाले की, केंद्र सरकार विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त ही यंत्रणा तयार करत आहे. व्यावसाय सुलभतेवरून आता जगण्यातील सुलभतेवर भर दिला जात आहे. आमच्या प्रक्रिया पारदर्शक आणि संवेदनशील आहेत. पायाभूत विकास क्षेत्रात झालेल्या अनेक विकास कार्यांचा त्यांनी उल्लेख केला. स्टार्ट अप प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याबाबत त्यांनी आपले विचार मांडले.
गरजूंना मदत करतांना भारत आणि इंडोनेशियाचा संवेदनशील दृष्टीकोन असतो, असे पंतप्रधान म्हणाले. भारत कोणाच्याही पारपत्राचा रंग पाहत नाही आणि ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्वांना मदत करतो, असे ते म्हणाले. भारत (इंडिया) आणि इंडोनेशिया यांची नावेच केवळ जुळत नाही तर त्यांची संस्कृती, परंपरा आणि लोकशाही मुल्यांमधील समानता आहे, असे ते म्हणाले. भारतात होत असलेल्या बदलांचे साक्षीदार बनण्यासाठी पंतप्रधानांनी समुदायाला भारताला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
योगाची त्यांनी आठवण करून दिली. जकार्तामध्ये त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. तेंव्हा ते बोलत होते.