Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
पेट्रोल- डिझेलच्या दराने गाठला 25 महिन्यांतील उच्चांक
![Petrol diesel prices rises to its peak since 25 Months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/petrol-price-hike-1.jpg)
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. तर डिझेलच्या दरानं 80 चा टप्पा ओलांडला आहे. मागील 10 महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच प्रतिलीटर 14 रुपयांची वाढ झाली आहे.
या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक महाग इंधनविक्री करणारं राज्य ठरत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल्या दरांत वाढ केली. ज्यामुळं डिझेलचे दर 26-29 पैशांनी आणि पेट्रोलचे दर 21-24 पैशांनी वाढले.