Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई
नितीन गडकरींनी शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण
![Nitin Gadkari took blessings of former Shiv Sena Chief Minister Manohar Joshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Nitin-Gadkari-took-blessings-of-former-Shiv-Sena-Chief-Minister-Manohar-Joshi.jpg)
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. नितीन गडकरी यांनी याच भेटीचे फोटो ट्विट केले आहे. जोशी गडकरी भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. नितीन गडकरी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
गडकरींनी मनोहर जोशींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, याशिवाय त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. गडकरींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवरील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते मनोहर जोशींचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. नितीन गडकरी आणि मनोहर जोशींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. मनोहर जोशींच्या कार्यकाळात गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहत होते.