Uncategorizedपुणे

धायरीत डॉक्टर तरुणाची आर्थिक कारणातून आत्महत्या

पुण्यातील धायरी परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. रुपेश सुरेश पाटील (वय 31) असे या डॉक्टर तरुणाचे नाव आहे.

धायरी परिसरात रुपेश पाटील यांचा छोटा दवाखाना होता. परंतु, दवाखाना व्यवस्थित न चालल्यामुळे त्यांनी लॉकडाऊनपूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्या व्यवसायात ही आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

19 डिसेंबरला रुपेश पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचे घर बंद असल्याने शेजार्‍यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button