जिजामाता रुग्णालयात ‘ड्राय रन’ पार पडली, 28 कर्मचा-यांचा समावेश
![The city of Pune will complete two vaccinations in a month ', the mayor assured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-vaccine.jpg)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात कोरोना लसीची ड्राय रन घेण्यात आली. 28 कर्मचा-यांवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात एकालाही लस टोचण्यात आली नाही.
या ड्राय रन (रंगीत तालीम) मध्ये 29 लाभार्थींना लसीकरणासाठी निवडण्यात आले होते. त्यामधील 28 लाभार्थी यांच्यावर लसीकरण प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम करण्यात आली. पण, प्रत्यक्षात लस टोचण्यात आलेली नाही. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.
लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवले जाते. ही सर्व प्रक्रिया आज केवळ ड्राय रन म्हणून पार पडली आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणालाही लस देण्यात आलेली नाही. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.