क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती; पिंपरी चिंचवड शहर भाजपा ओबीसी मोर्चातर्फे अभिवादन
![Savitribai Phule jayanti PCMC BJP OBC Morcha prays tribute](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Savitribai-Phule-jayanti-PCMC-BJP-OBC-Morcha-prays-tribute.jpg)
पिंपरी चिंचवड शहर भाजपा ओबीसी मोर्चातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, आमदार लक्ष्मण जगताप, व पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने मोशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करुन मानवंदना करण्यात आली.
यावेळी भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर, शंकर लोंढे, प्रविण गोरे, प्रविण बनकर, निलेश बोराटे, योगेश अकुलवार, राजेश डोंगरे, ललित म्हसेकर, भाजप नेत्या सुरेखाताई बनकर, मीनाताई बनकर, स्मिता आल्हाट, मनीषा सस्ते, पूजा आल्हाट, सिंधू आल्हाट, अलका वाघोले, अंजना आल्हाट, अरुणाताई बोराटे, सुजाता बोराटे, नीता गोरे, मनीषा बोराटे, संगीता सस्ते, कवीता धायरकर तसेस भाजप कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.