breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोना असूनही कोल्हापूरच्या अंबाबाईला भक्तांनी केले ‘इतके’ दान

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा या देवस्थानाला दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो भाविक येत असतात. पण कोरोना महामारीमुळे भक्तांच्या संख्येत घट झाली होती. पण तरीही भाविकभक्तांनी अंबाबाई आणि जोतिबाला भरभरून दान केलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देणगीचं बुधवारी मोजमाप करण्यात आलं. यामध्ये अंबाबाई देवस्थानला भक्तांकडून मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्यात आल्याची माहिती समोर आली.

2019- 20 या आर्थिक वर्षात तब्बल 83 लाख रुपये किंमतीचे दागिने भक्तांनी दान केल्याचं या मोजणीतून उघड झालं. अंबाबाई आणि श्री जोतिबा मंदिरात 2 किलो 186 ग्राम सोनं अर्पण करण्यात आलं आहे

वाचाः नाताळ साधेपणाने साजरा करा, गृहमंत्र्यांचे आवाहन

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा या दोन्ही मंदिरांत 25 किलो 982 किलोग्राम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. हे सर्व दागिने आता योग्य पद्धतीनं जतन करण्यात येतील. देवस्थान समितीनं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2019 चे मार्च 2020दरम्यानच्या काळात अंबाबाई मंदिरात 71 लाख, तर जोतिबा मंदिरात 12 लाखांचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत.

पण कोरोना काळातील लॉकडाऊन नियमांमुळं यातही घट झाली असल्याचं कळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना काळात मंदिरं अनेक महिने बंदच होती. ज्यामुळं मंदिराच्या दिशेनं भाविक न आल्यामुळं मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 43 लाखांच्या दागिन्यांत घट झाल्याचं म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button