‘कोरोनाची पहिली लस पंतप्रधान मोदींनी घ्यावी, मग आम्ही घेऊ’; ‘या’ नेत्याचे विधान
![RJD Tej Pratap Yadav says PM Narendra Modi should take corona vaccine first then we will take](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/RJD-Tej-Pratap-Yadav-says-PM-should-take-corona-vaccine-first-then-we-will-take.jpg)
कोरोना लसीची प्रतीक्षा संपली आहे. भारतातील कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींना आपात्कालीन परवानगी देण्यात आली आहे. सध्या देशभरात कोरोना लशीचं ड्राय रन सुरू आहे. प्रत्यक्षात लसीकरण सुरू होण्याच्या आधीच कोरोनाची लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली घ्यावी आणि त्यानंतर आम्ही घेऊ असं RJD नेत्यानं सांगितलं आहे.
विरोधी पक्ष नेते कोरोना लस लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी भाजपवर टीका करत आहे. या अनुषंगाने बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि RJD नेते लालू यादव यांचे मोठे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी हे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्ही ही लस घेऊ असं विधान त्यांनी केलं आहे. याआधी देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोना लस मिळण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
साधारण 13 जानेवारीपासून देशभरात कोव्हिड 19 च्या लसीकरणास सुरुवात होऊ शकते. दरम्यान या लसीकरणाबाबत सर्व माहिती CoWIN अॅपवर उपलब्ध करण्यात येईल, या अॅपच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिनसाठी फ्री रजिस्ट्रेशन करू शकता, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.