कॅनमध्ये अडकलेल्या सापाची प्राणी मित्राकडून सुखरुप सुटका
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुण्यातील चांदखेड, बेबड ओव्हळ या दोन गावाच्या दरम्यानच्या परिसरातून धामण जातीच्या सापाचे तोंड अॅल्युमिनियमच्या कॅनमध्ये अडकलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आला. प्राणीमित्रांनी या सापाची सुखरुप सुटका केली.
प्राणीमित्र तुषार पवार, नितीन, दीपक कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या सापाचा खूप वेळ शोध घेतला. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश आले. त्या सापाला सुखरूप मारुंजी येथे आणून त्या धामणीला नेले. प्राणिमित्र गणेश भूतकर यांच्यासह सर्वांनी अवश्यक्तेनुसार आणि सुरक्षित वस्तूंचा वापर करत कुठलीही इजा न होऊ देता सापाची यशस्वी सुटका केली.
”माणसांचा व मानव निर्मित वस्तूंचा खूप त्रास निसर्गाच्या कुशीत जगत असणाऱ्या अनेक प्राण्यांना भोगावा लागत आहे. याचा कुठे तरी विचार व्हायला हवा. अश्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण आपल्या परिसरात काम करत आहोत.” , असे मत मांडताना गणेश भूतकर यांनी त्यांचा नंबर (९९७०६६८८८६) शेअर केला आहे.