‘ईन शॉर्ट संजय राऊत महाविकासआघाडीत घंटा आहे’, त्या फोटोवरून राणेंची टीका
![Nilesh Rane critisize Shivsena Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sanjay-raut-Nilesh-Rane.jpg)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते देखील उपस्थित होते. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमातील एक फोटो सोशल मीडियावर शेयर केले.
![Nilesh Rane critisize Sanjay Raut over aditya thakray photo](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Nilesh-Rane-critisize-Sanjay-Raut-over-aditya-thakray-photo.jpg)
मात्र या कार्यक्रमात ठाकरे सरकार स्थापन करण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच फोटोवरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत फक्त सामना पेपर आणि मीडियासमोर ओकण्यासाठी असून, महाविकास आघाडीत ते केवळ घंटा आहेत, अशी आक्षेपार्ह्य भाषेत टीका केली आहे.
निलेश राणे यांनी फोटो शेअर करत ट्विट केले की, अजून एक गोष्ट या फोटोमध्ये जाणवली ती म्हणजे संजय राऊतला या पार्टीत सुद्धा बोलवलं नाही. भावाला मंत्रीपद पण नाही व विकास आघाडीच्या कुठल्या कार्यक्रमाचे आमंत्रण पण नाही, संज्या फक्त सामना पेपर आणि मीडियासमोर ओकण्यासाठी. ईन शॉर्ट संजय राऊत महाविकासआघाडीत घंटा आहे.