‘आप’च्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात चिंचवड स्टेशन येथे जनजागृती
![Public awareness at Chinchwad station against rising inflation on our behalf](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/आपच्या-वतीने-वाढत्या-महागाईच्या-विरोधात-चिंचवड-स्टेशन-येथे-जनजागृती.jpg)
पिंपरी: आम आदमी पार्टीच्या वतीने चिंचवड स्टेशन राका गॅस कॉर्नर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने ब्रह्मानंदी जाधव यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात जनजागृती करण्यात आली. प्रभागामधील झोपडवासीयांना सुसज्ज व पक्की घरे मिळाली पाहिजेत. महिलांना स्वयंरोजगार केंद्र उभी राहिली पाहिजेत असे मत ब्रह्मानंदी जाधव यांनी व्यक्त केले. पिंपरी विधानसभा अध्यक्ष नंदू नारंग यांनी देशाच्या भविष्यासाठी मुलांना चांगलं शिक्षण व आरोग्य उच्च दर्जाचे मिळावा, यासाठी आम आदमी पार्टीला तुम्ही सहकार्य करावे असे आवाहन केले.
उपाध्यक्ष महेश बिरादार यांनी आम आदमी पार्टीच्या कामाची गॅरंटी दिली. जर आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड मध्ये सत्तेत आली, तर ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या योग्य व माफक दरात दिल्या जातील याची गॅरंटी दिली. स्मिता पवार म्हणाल्या की, दुग्धजन्य सर्व पदार्थांवर सरकार कडून जीएसटी आकारला जातो, आता फक्त गाई यांच्यावरच टॅक्स आकारणे शिल्लक राहिलेले आहे असे मत व्यक्त केले.
महापालिकेत चाललेला अनागोंदी कारभार त्यामुळे विकासाला बसलेले खिळ, आणी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे, असे मत चिंचवड संपर्कप्रमुख गोविंद माळी यांनी व्यक्त केले.
यावेळी आप प्रवक्ते प्रकाश हागवणे, शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, कवी विवेक मिसाळ, यांनी तीव्र शब्दात महानगरपालिकेचे वाभाडे काढले. डॉ. अमर डोंगरे, सुरेश भिसेसिं, अजय सिंग, गणेश करडे, शिवम जाधव, आकाश धोत्रे, सोमनाथ बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चंद्रमणी जावळे यांनी आभार व्यक्त केले.