breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अशोक कामटे अभ्यासिकेत कर्मचा-यांची मनमानी, ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

  • मुजोर ग्रंथपाल, कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना होतोय त्रास
  • ग्रंथपाल असो की शिपाई तत्काळ हकालपट्टी करा, दत्ता साने यांची सूचना

पिंपरी, (महाईन्यूज) – सांगवीतील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहीद अशोक कामटे अभ्यासिकेत ग्रंथपाल आणि इतर कर्मचा-यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ऐन परिक्षेच्या काळात स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ग्रंथपाल महिलेला हाताशी धरून गाववाला शिपाई विद्यार्थ्यांवर रुबाब गाजवत आहे. त्यामुळे दोन दिवसांवर परीक्षा आलेली असताना डोक्यात नको ते खूळ घालून मनसिक संतुलन बिघडवून घेण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. अशा मुजोर ग्रंथपाल आणि शिपाई कर्मचा-यांना पोसण्याचा उद्योग पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन करत आहे.

  • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी येथे शहीद अशोक कामटे यांच्या नावाने अभ्यासिका सुरू केली आहे. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पच्छिम महाराष्ट्रातील विद्यार्थी “आपले सर्वस्व समाजकार्यासाठी अर्पण करण्याच्या उद्देशाने पेटून” याठिकाणी भारतीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची आहोरात्र तयारी करत आहेत. शासनाने 2 जून रोजी यूपीएससीची परीक्षा घेतली. या परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेतील ग्रंथपाल प्रतिभा लुनावत यांनी 1 जून रोजी प्रवेश नाकारला. “तुम्ही आता अभ्यासिकेत येऊ शकत नाही”, अशी सूचना त्यांनी दिली. दोन दिवसांवर आलेल्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक-एक मीनिट पदरात पाडून घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून ग्रंथपाल लुनावत यांच्या जाचक नियमांचा सामना करावा लागला. अशा पध्दतीने भविष्यात अधिकारी म्हणून “समाजकार्य करण्याची इच्छा मनात बाळगणा-या” विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच्याविरोधात वाचा फोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत धाव घेऊन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याकडे ग-हाणे मांडले.

पालिकेतील विरोधी पक्षनेते साने यांनी तत्काळ आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. त्यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधून विचारणा केली. पुढील सहा महिन्यांसाठी विद्यार्थ्यांना अशोक कामटे अभ्यासिकेत अभ्यास करण्याची परवानगी देण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साने यांचे आभार मानले.

  • राज्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी करिअर करण्याच्या दृष्टीने शहरात येतात. त्यांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अभ्यासिका सुरू केल्या आहेत. त्यामध्ये अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. आज हेच विद्यार्थी उद्याचे अधिकारी म्हणून लोकांची सेवा करणार आहेत. त्यांच्या तयारीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण केल्यास संबंधीत ग्रंथपाल प्रतिभा लुनावत असो अथवा गाववाला शिपाई त्यांना तत्काळ निबंलित करावे. अन्यथा याचे परिणाम खूप वाईट होतील.

 

  • दत्ता साने, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड मनपा  
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button