breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फिरवला ना बुलडोझर! : युपीत योगीजी अन् महाराष्ट्रात देवेंद्रजी..!

भाजपा आमदार महेश लांडगे यांची खणखणीत प्रतिक्रिया

अत्याचाऱ्यांची खैर नाही; नराधम नौशाद शेखच्या अवैध बांधकामावर हातोडा

पिंपरी : अत्याचारी, नराधमांचा बिमोड करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली. चुकीची कामे करणाऱ्यांच्या अवैध बांधकामांवरती अक्षरश: बुलडोझर फिरवला. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थेतील मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नौशाद शेख सारख्या प्रवृत्तींना वचक बसवण्यासाठी त्याच्या अवैध बांधकामावरती हातोडा घातला. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे, अशी खणखणीत प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्थाचालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर पिंपरी-चिंचवडची बदनामी झाली. अनेक निष्पाप मुलींना अत्याचाराचा सामना करावा लागला. त्यामुळे नौशाद शेख याची संस्था आणि बांधलेली इमारत याबाबत चौकशी करून त्याला धडा शिकवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील हिंदुत्ववादी संस्था संघटना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या संस्थेच्या अतिक्रमणावर शुक्रवारी बुलडोझर चालविला आला.

हेही वाचा – चिपळूणमध्ये राणे समर्थक-ठाकरे गटामध्ये राडा, निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

आरोपी नौशाद शेखर याच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची समांतर चौकशी सुरु केली. पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पॉस्को आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली. यानंतर अशा नराधमांच्या संस्थेवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी जाहीरपणे केली होती. अशा नराधमांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील हा प्रकार घातला होता. त्यामुळे गृह खात्याकडून देखील या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. आमदार लांडगे यांनी इशारा दिल्याप्रमाणे आज महापालिकेच्या अनधिकृत कारवाई पथकाने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला.

रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्था चालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अशा प्रवृत्तींना शहरात कदापि थारा देवू नये आणि संबंधितांच्या बेकायदा संस्था व बांधकामांवर बुलडोझर फिरवणार, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडकरांना जाहीरपणे दिली होती. आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्या संस्थेच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालविला. याबाबत पोलीस आणि महापालिका प्रशसनाचे तमाम हिंदू समाज संघटनांकडून कौतूक आहेच. पण, या नराधमावर आणखी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भावना आहे.

– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा पिंपरी- चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button