breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

विजय चौधरीची ‘सुवर्ण कामगिरी’; जागतिक स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक

पुणे : ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ आणि अप्पर पोलीस अधिक्षक विजय चौधरी यांनी कॅनडा येथे झालेल्या पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीने कुस्ती या खेळात देशाचे नाव उंचावले आहे.

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. या स्पर्धेत जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले विजय चौधरी यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. अटीतटीच्या सामन्यात विजय चौधरी यांनी प्रतिस्पर्धी अमिरिकेच्या जे. हेलिंगर याचा १० गुणांची मोठी आघाडी घेत ११-०१ ने पराभव केला.

हेही वाचा – ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? केवळ ५ संघांना मिळणार संधी!

विजयानंतर बोलताना चौधरी म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button