breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महत्वाची बातमी! आधार, रेशन कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत वाढली

Aadhaar-Ration Card Link : देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल आणि शासनाच्या स्वस्त दरातील धान्याचा तसेच मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीही खास राहणार आहे. खरंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी, शिधापत्रिकाधारक लोकांसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे कोरोना काळापासून शासनाकडून मोफत धान्य पुरवले जात आहे. तसेच डिसेंबर २०२३ पर्यंत शासनाकडून मोफत धान्य पुरवले जाणार आहे.

मात्र शासनाच्या या योजनेचा अनेकजण चुकीच्या पद्धतीने लाभ उचलत आहेत. अनेक लाभार्थ्यांचे दोन रेशन कार्ड आहेत. दोन रेशन कार्ड मध्ये नाव असलेले अनेक लाभार्थी आढळून आले आहेत. यामुळे केंद्र शासनाने या अशा अपात्र लाभार्थ्यांवर लगाम लावण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रेशन कार्ड धारक लोकांना आपले रेशनकार्ड आधार कार्डसोबत लिंक (Aadhaar-ration Card Link) करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – ‘मानवी संवेदनेतून कवितेचा उगम’; देवेंद्र फडणवीस यांचं विधान

शासनाने शिधापत्रिका धारक लोकांना आपले आधार कार्ड शिधापत्रिका सोबत लिंक करण्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत मुदत दिली होती. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत अनेक लोकांनी लिंकिंग पूर्ण केलेली नाही. परिणामी आता शासनाने या कामासाठी मुदतवाढ दिली आहे. शासनाने आता हे काम पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. अर्थातच तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button