ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाची दमदार कामगिरी

साडे सहा लाख रुपये किंमतीच्या 14 दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवडः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरांस अटक करत त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या. अट्टल वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा यानिमित्ताने पर्दाफाश करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहन चोरी, घरफोडीच्या गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत त्या अनुषंगाने वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस उप निरीक्षक महेश खांडे व दरोडा विरोधी विरोधी पथकाचे अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयातील उघडकीस न आलेले वाहन चोरीच्या गुन्हयाबाबत माहिती घेवुन, रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करून, त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून, पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील त्यांचे आस्तित्वाबाबत तांत्रिक विश्लेषण करून, गोपनीय माहितीच्या आधारे, वाहन चोरांचा शोध घेत असताना, आळंदी बस स्टॉप आळंदी पुणे या ठिकाणी दोन इसम चोरीची गाडी घेवून येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई अमर कदम व गणेश कोकणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत प्राप्त झाली.

माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सहा पोलीस उप निरीक्षक महेश खांडे यांची एक टिम तयार करून त्यांना कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे वरील टीमने वरील ठिकाणी सापळा रचला असता माहिती मधील दोन इसम सदर ठिकाणी मिळून आले. त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे व पत्ते १) शुभम अशोकराव लोंढे वय २१ वर्षे रा. शेळके महाराज यांचे खोलीत खंडोबा मंदीराजवळ, आळंदी पुणे २) सचिन समाधान दळवी वय २३ वर्षे रा. शेळके महाराज यांचे खोलीत खंडोबा मंदीराजवळ, आळंदी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीकडुन विचारपुस करता, त्यांनी आळंदी पोलीस ठाणे गुरनं ३०८ / २०२३ भादवि कलम ३७९ हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, त्यांना सदर गुन्हयात दिनांक ०९/०५/२०२४ रोजी अटक करण्यांत आली.

तसेच त्यांचा तिसरा साथीदार यश शिवाजी भोसले रा. दत्त मंदीराजवळ, आळंदी देवाची जि. पुणे यास दिनाक १० मे २०२४ रोजी ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याचा देखील दाखल गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीतांचा पुर्व इतिहास तपासून, आरोपी आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने, आरोपींची दिनांक १४ मे २०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची घेवून, सखोल व बारकाईने तपास करून, त्यांचेकडून एकूण १४ दुचाकी मोटार सायकली हस्तगत करण्यांत आल्या. त्यामध्ये बजाज पल्सर 1, बजाज स्प्लेंडर 12, बजाज अॅव्हेंचर 1 या मोटारसायकलींचा समावेश आहे.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो मा. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, बाळासाहेब कोपनर, यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे,अमर कदम व समीर रासकर यांचे पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button