breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

पिंपरीत संजोग वाघेरे पाटील‌ यांच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद; व्यापारी, व्यावसायिकांसह मतदारांशी साधला संवाद

फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव करत स्वागत

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. या पदयात्रेत “संजोग वाघेरे पाटील आगे बडो, हम तुमारे साथ है”…”एकच ध्यास, “मावळ लोकसभेचा विकास”,  अशा घोषणा देत असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पदयात्रेत मतदरांना संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले,

संजोग वाघेरे यांच्या पदयात्रेस पिंपरीगावातून प्रारंभ झाला. पुढे पिंपरी बाजारपेठेत गुरुद्वारा, साई चौक, शगुन चौक, अशोक चौक, रिव्हर रोड, डीलक्स चौकासह परिसरातील व्यापारी व मतदार बंधू-भगिनींना अभिवादन करत संजोग वाघेरे पाटील यांनी मशाल चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड  गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, मावळ लोकसभेचे प्रचारप्रमुख योगेश बाबर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी व्यापारी, व्यावसायिकांनी संजोग वाघेरे पाटील यांचे आपुलकीने ठिकठिकाणी स्वागत केले. पदयात्रेत “संजोग वाघेरे पाटील आगे बडो, हम तुमारे साथ है”…”एकच ध्यास, “मावळ लोकसभेचा विकास”, “येऊन येऊन येणार कोण ?, संजोग वाघेरेंशिवाय दुसरं आहेच कोण ?’ अशा घोषणांनी पिंपरीतील परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. या भागात पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सरकारच्या धोरणांवर व्यापारी नाराज, त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडू’; संजोग वाघेरे

व्यापारी वर्गासोबत संवाद साधताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकारमुळे सर्वसामान्य वर्ग बेजार झालेला आहे. परंतु, नोटबंदी, जीएसटी आणि जाचक कायद्यामुळे व्यापारी, व्यावसायिक वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे. तर दुसरीकडे मावळ लोकसभेतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारसंघात पिंपरीसह अनेक ठिकाणी लहान-मोठ्या बाजारपेठा आहेत. व्यापारी वर्गाला उद्भभणा-या अडचणी आणि त्यांचे प्रश्न मांडण्याकडे आताच्या खासदारांनी दुर्लक्ष केले. व्यापारी वर्गाचे प्रश्न मांडून त्याला वाचा फोडण्याचे काम करू, असे आश्वासन या निमित्ताने वाघेरे यांनी व्यापारी वर्गाला दिले. तसेच, येत्या 13 तारखेला मशाल चिन्ह लक्षात ठेवून उद्धव ठाकरे साहेबांची स्वाभीमानी शिवसेना आणि महाविकास आघाडीला विजयी करा, अशी साद त्यांनी घातली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button