breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१० वी आणि १२ वी नंतरच्या ‘या’ प्रवेश प्रक्रियेस सुरुवात..

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. ०१ जून २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

१० वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुण्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; शहरात तब्बल २८०० सीसीटीव्ही कॅमेरे

विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेबाबत महत्त्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली असून ही यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये, विकल्प अर्ज भरताना उमेदवारांना ‘मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)’ अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात येणार आहेत.

विद्यार्थी त्यांचा केवळ १०वी/१२वीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिनमधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button