breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय कुस्टीपटू अंतिम पंघालची ऑलिम्पिकमधून हकालपट्टी, पॅरीस सोडण्याचे आदेश

Antim Panghal | भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या अपात्रतेच्या कारवाईमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चर्चेत असताना आणखी एक मोठी बातमी हाती लागली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंतिम पंघाल हिला पोलिसानी समन्स बजावले आहे. त्याला कारणीभूत तिची बहीण ठरली आहे.

नेमकं काय घडलं?

अंतिम पांघालवर ऑलिम्पिक व्यवस्थापनानं घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नियमभंगामध्ये अंतिम पांघालच्या बहिणीला पॅरिस पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर तिला पोलिसांनी सोडलं. मात्र, त्यानंतर अंतिम पांघालला पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आणि तिच्या सपोर्ट स्टाफसह तिची पुन्हा भारतात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा     –      बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये सर्व स्पर्धा खेळवल्या जात असून तिथेच खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी खेळाडू, त्यांचा सपोर्ट स्टाफ व इतर व्यक्तींसाठी काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येते. ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमधून स्वत:चं काही सामान आणण्यासाठी अंतिम पांघालनं तिची बहीण निशाला पाठवलं होतं. पण ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या पासेसशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. निशाकडे अंतिम पांघालचा पास पाहून पोलिसांना संशय आला व त्यांनी निशाला ताब्यात घेतलं.

निशाची चौकशी केल्यानंतर पॅरिस पोलिसांना सर्व प्रकार स्पष्ट झाला. यानंतर पोलिसांनी निशाला सोडलं खरं, पण स्वत:चा खेळाडू असल्याचा पास अंतिम पांघालनं दुसऱ्या व्यक्तीला वापरायला दिल्यामुळे झालेला नियमभंग व्यवस्थापनानं गंभीर मानला व त्यासाठी अंतिमवर थेट स्पर्धेतून बाहेर जाण्याची कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button