चेन्नई की गुजरात कोण मारणार बाजी? समारोप सोहळ्याला येणार ‘हे’ कलाकार..
![The final match of IPL will be played in Super Over](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/IPL-2023-Final--780x470.jpg)
IPL 2023 Final : आयपीएलमधील फायनल सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये उद्या २८ मे २०२३ रोजी होणार आहे. या रंगतदार सामन्यामध्ये आता आयपीएल ट्रॉफी कोण आपल्या नावावर करणार आहे, हे सर्व बघणे महत्वाचे ठरणार आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार हा सामना सुरू होण्यापूर्वी आयपीएल समारोप सोहळ्याचा कार्यक्रम असणार आहे. फायनलपूर्वी हा सोहळा संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार असून या समारोपात रॅपर & सिंगर किंग, डीजे न्यूक्लेया परफॉर्म करणार आहेत.
हेही वाचा – सरकारी योजना : ‘या’ योजनेत मिळतंय ‘इतकं’ अनुदान, तरुण-तरुणींसाठी मोठी संधी!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/349318984_943855716888739_2880719838581082025_n.jpg)
यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, हे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले होते. यापैकी चेन्नई-गुजरातमध्ये फायनल होऊन विजेत्या संघाला २० कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये बक्षिस मिळणार आहे. त्यानंतर इतर संघानाही बक्षिस देण्यात येणार आहे.