Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत-न्यूझीलंड फायनल रद्द झाल्यास चॅम्पियन कोण? ICC चा नियम काय सांगतो

ICC Men’s T20 World Cup 2026 Final | आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून संध्याकाळी ७ वाजता खेळाला सुरुवात होईल. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला तर विजेता कोण ठरणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

International Cricket Council (ICC) च्या नियमानुसार अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. ८ मार्च रोजी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर उर्वरित खेळ ९ मार्चला खेळवला जाईल. जर पहिल्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही, तर राखीव दिवशी सामना नव्याने सुरू केला जाईल.

हेही वाचा       :                “मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही”; नितीन गडकरींचा इशारा

अंतिम सामन्यासाठी पहिल्या दिवशी अतिरिक्त ९० मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला आहे. तर राखीव दिवशी १२० मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे. सामन्याचा निकाल लागावा यासाठी ICC कडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. मात्र दोन्ही दिवशीही पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल, असा ICC चा नियम आहे.

दरम्यान, अहमदाबादमध्ये सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून पावसाची शक्यता कमी असल्याने सामना सुरळीत पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button