breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी
विराट कोहलीकडे पुन्हा आरसीबीचा नेतृत्व; टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
![Virat Kohli to lead RCB again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/virat-kohli-780x470.jpg)
IPL 2023 : आयपीएस २०२३ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्वा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. आरसीबीने आत्तापर्यंत पाच सामन्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे फाफच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थितत केला जात आहे. पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात आरसीबीची सूत्र विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे.
सामन्याची नाणेफेक झाल्यानंतर आरसीबी संघाची सुत्रे विराट कोहलीकडे सोपवली आहेत. फाफ आज क्षेत्ररक्षण करणार नाही. त्यामुळे तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल, वैशाकसोबत बदल असेल. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी केली असती, खेळपट्टी संथ होऊ शकते, असं विराट कोहलीनं म्हटलं आहे.
फाफ डु प्लेसिला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे तो या सामन्यात फक्त फलंदाजी करणार आहे. त्यामुळे आरसीबी संघाचे नेतृत्व विरोट कोहलीकडे सोपवलं आहे.