breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

टोकियो पॅरालिम्‍पिक : मनीष नरवाल याला सुवर्ण, सिंहराजला रौप्‍य

टोकियो – टोकियो पॅरालिम्‍पिकमध्‍ये नेमबाजीत आज भारताच्‍या मनीष नरवाल याने सुर्वण पदकाला गवसणी घातली तर सिंहराज याने रौप्‍य पदकावर आपली मोहर उमटवली. मनीष नरवाल याच्‍या कामगिरीने टोकियो पॅरालिम्‍पिकमध्‍ये भारताने तिसरे सुवर्ण पदक पटकावले आहे.

५० मीटर पिस्‍तुल एसएच १ नेमबाजीमध्‍ये मनीष नरवाल याने २१८.२ च्‍या गुणांसह प्रथम स्‍थान पटकावले तर सिंहराज हा २१६.७ गुणांची कमाई करत दुसर्‍या स्‍थानावर राहिला.टोकियो पॅरालिम्‍पिक मध्‍ये भारताने आतार्पंयत ३ सुवर्ण, ७ रौप्‍य आणि ५ कांस्‍य पदक पटकावली आहे. पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेतील भारताची ही आजरवची सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी ठरली आहे.

बॅडमिंटनमध्‍ये भारताची दोन पदके निश्‍चित
टोकिया पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सुहास यतिराज आणि प्रमोद भगत यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामुळे भारताची आणखी दोन पदके निश्‍चित झाली आहेत.बॅडमिंटन एसएल-४ एकेरी स्‍पर्धेत सुहास यतिराज याने उपांत्‍य सामन्‍यात इंडोनेशियाचा खेळाडू सेतियावान फ्रेडी याला पराभव केला. तर प्रमोद भगत याने बॅडमिंटन एसएल-३ एकेरी स्‍पर्धेत उपांत्‍य फेरीत जपानच्‍या डी फुजिहारा याला २१-११ आणि २१-१६ अशी मात देत अंमित फेरीत आपले स्‍थान निश्‍चित केले.

पॅरालिम्पिक स्‍पर्धेत बॅडमिंटनमध्‍ये पहिले सुवर्णपदक नोंदवण्‍याची संधी दोन्‍ही खेळाडूंना आहे.शुकृवारी प्रवीणकुमारने उंच उडीत रौप्‍य पदक पटकावले होते.अवनी लेखारा हिने महिलांच्‍या ५० मीटर रायफल पी-३ स्‍पर्धेत कांस्‍य तर तिरंदाजीमध्‍ये हरविंदर सिंगने कास्‍य पदकावर मोहर उमटवली होती.

भारताची आतापर्यंत १५ पदकांवर मोहर
टोकियो पॅरालिम्‍पिक मध्‍ये भारताने आतार्पंयत ३ सुवर्ण, ७ रौप्‍य आणि ५ कांस्‍य पदक पटकावली आहे.पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेतील भारताची ही आजरवची सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी ठरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button