भारत न्यूझीलंड यांच्यात तिसरा सामना,मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज!

IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आज (२५ जानेवारी) गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकल्यास सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ३-० अशी अजेय आघाडी घेण्याची संधी आहे. मात्र, हा सामना फ्रीमध्ये कसं आणि कुठं पाहायचं? जाणून घेऊया.
एकीकडे सूर्याचे नेतृत्त्वाखाली टीम इंडिया मालिका खिशात प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, मिचेल सँटनरचा किवी संघ मालिकेत टिकून राहण्यासाठी जीवाचे रान करेल. दोन्ही संघातील तिसरा सामना आज (२५ जानेवारी) संध्याकाळी सात वाजता बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.
हेही वाचा – केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान!
या मालिकेत आतापर्यंत भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात २०९ धावांचे विशाल लक्ष्य ७ गडी राखून सहज गाठले. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये असून भारतीय गोलंदाजही किवी फलंदाजांना शांत ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.




