Disney+ Hotstar ची मोठी घोषणा! वर्ल्डकप आणि आशिया कप मोफत पाहता येणार
![The World Cup and Asia Cup can be watched for free on Disney+ Hotstar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Disney-Hotstar-780x470.jpg)
Disney+ Hotstar : IPL 2023 चे सर्व सामने Jio ने मोफत दाखवले. यामुळे इतर OTT प्लॅटफॉर्मला मोठा फटका बसला. सर्वाधिक फटका Disney+ Hotstar ला बसला. आता आगामी ICC क्रिकेट वल्डकप आणि आशिया कप सामने मोफत दाखवण्याचा निर्णय Disney+ Hotstar ने घेतला आहे.
Disney+ Hotstar वर थेट क्रिकेट सामने पाहण्यासाठी वर्षभराचे पैसे घ्यावी लागत होती. मात्र आता आशिया कपचे आणि एकदिवसीय विश्वचषकाचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर मोफत मध्ये होणार आहे. पण ही सेवा फक्त मोबाईल युजर्सना मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की ५४० दशलक्षाहून अधिक मोबाइल वापरकर्त्यांना याचा फायदा होईल, ते विनामूल्य मोबाइलवर सामना पाहू शकतील.
हेही वाचा – OMG 2 : अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ या दिवशी होणार रिलीज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-30.png)
Disney+ Hotstar प्रमुख सजिथ शिवनंदन म्हणाले, आमची कंपनी भारतातील वेगाने वाढणाऱ्या OTT उद्योगात आघाडीवर आहे. आम्ही आतापर्यंत प्रेक्षकांचा अनुभव वाढवण्यासाठी अनेक नवकल्पना सादर केल्या आहेत, ज्याद्वारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना जागतिक स्तरावर खुश केले आहे.
आम्ही आता आशिया चषक आणि ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला विश्वास आहे की असे केल्याने कंपनीला संपूर्ण इको-सिस्टिम विकसित करण्यात मदत होईल.