Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल 2026 चा थरार

IPL 2026 | जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची आणि बहुप्रतीक्षित बातमी समोर आली आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या २०२६ हंगामाची सुरुवात कधी होणार याची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. आयपीएलचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने सामाजिक माध्यमांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.

या घोषणेनंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी पहिल्या सामन्याची तारीख समोर आल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा     :            संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून; अनेक मुद्द्यांवर चर्चा 

मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाचा यंदाही विजेतेपद कायम राखण्याचा निर्धारआहे.

दरम्यान, आरसीबीच्या चाहत्यांसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे संघाला यंदा त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे काही सामने खेळण्याची परवानगी मिळाली आहे.

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होण्यास सध्या थोडा विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे आगामी काळात आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका. या राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचे सामने आयोजित केले जात असल्यामुळे निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतरच स्पर्धेचे अंतिम आणि सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button