India vs SA Womens Final | भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्या जेतेपदासाठी थरारक लढत!

INDW vs SAW Final | आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेचा शिखर सामना आज (रविवार, 2 नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली असून, आजच्या सामन्यात त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. दोन्ही संघ अद्यापपर्यंत विश्वचषक विजेते झालेले नसल्याने, आज महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी २:३० वाजता होईल.
हेही वाचा : राज ठाकरेंकडून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं कौतुक; सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्
सामना कुठे पाहता येईल?
महिला विश्वचषकाचा हा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट (Live) पाहता येईल. ऑनलाइन प्रेक्षकांसाठी सामना जिओसिनेमा आणि हॉटस्टार अॅप व वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे उपलब्ध असेल.
भारत महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधाना (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टिरक्षक), उमा चेत्री (यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, शफाली वर्मा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
दक्षिण आफ्रिका महिला संघ:
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताझ्मिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक), काराबो मेसो (यष्टिरक्षक), अॅनेके बॉश, नदीन डी क्लर्क, अॅनेरी डेर्कसेन, मारिझान काप, सुने लस, नॉन्डुमिसो शांगासे, क्लोई ट्रायॉन, अयाबोंगा खाका, मासाबाता क्लास, नोनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने.





