क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

टेनिस प्रिमियर लीगच्या सहाव्या पर्वासाठी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची निवड

टेनिस विश्वातील काही प्रमुख खेळाडू हिंदुस्थानात खेळणार

मुंबई : टेनिस प्रिमियर लीगच्या सहाव्या पर्वासाठी नव्या केंद्राची निवड केली आहे. भव्य स्वरुपात लीग पार पडण्यासाठी या वेळी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (CCI) निवड करण्यात आली आहे. ही लीग 3 ते 8 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. टेनिस प्रिमियर लीग 2024 मधील टप्प्यासाठी टेनिस विश्वातील काही प्रमुख खेळाडू हिंदुस्थानात खेळणार आहेत. यामध्ये फ्रान्सचा ह्युगो ह्यूस्टन (जागतिक क्रमवारी 61), हिंदुस्थानचा सुमित नागल (जागतिक क्रमवारी 74) या परुष, तर पोलंडची मॅग्डा लिनेट (जागतिक क्रमवारी 41), अर्मेनियाची एलिना अवनेसियान (जागतिक क्रमांक52) या महिला खेळाडूंचा समावेश असणार आहे.

टेनिस प्रिमियर लीगच्या पाच यशस्वी पर्वांननंतर आयपीएलप्रमाणे टीपीएलची देखिल चर्चा वाढली आहे. लीगमुळे 25 गुणांची पद्धती चाहत्यांना आकर्षित करत आहे. टेनिस चाहत्यांचे लक्ष वेधून सर्व फ्रॅंचाईजी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याकरता 5 सामने खेळतील. प्रत्येक साम्नयात पुरुष, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी अशा लढतींचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात 100 गुण असतील. प्रत्येक श्रेणीचे मूल्य 25 असेल. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक संघ साळखी टप्प्यात एकूण 500 गुणांसाठी खेळतील. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. लीगमध्ये पीबीजी पुणे जग्वार्स, बंगाल विझार्डस, पंजाब पॅट्रियट्स, हैदराबाद स्ट्रायकर्स, गुजरात पॅंथर्स, मुंबई लिओन आर्मी, गतविजेते बंगळुरू एसजी पायपर्स या फ्रॅँचाईजी संघांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button