TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

टाटा स्टील चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धा : भारताच्या अर्जुनला जेतेपद

विक अ‍ॅन झी– भारताच्या अर्जुन इरिगेसीने टाटा स्टील चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा पी. हरिकृष्णा, बी. अधिबन आणि विदित गुजरातीनंतरचा तो चौथा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. या स्पर्धेच्या १२ फेऱ्यांत १८ वर्षीय अर्जुनच्या खात्यावर ९.५ गुण होते. त्यामुळे एक फेरी शिल्लक असतानाच त्याचे जेतेपद पक्के झाले. त्याने १२व्या फेरीत व्हिएतनामच्या थाय डॅन वॅन नुयेनला बरोबरीत रोखले. अर्जुनने चॅलेंजर्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना सात सामने जिंकले, तर त्याचे पाच सामने बरोबरीत सुटले. या कामगिरीसह तो पुढील वर्षीच्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्येही प्रवेश मिळवला आहे.

भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या ११व्या फेरीत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. त्यामुळे विदित सहा गुणांसह संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या आर. प्रज्ञानंदला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अमेरिकेच्या फॅबिआनो कारूआनाने पराभूत केल्यामुळे त्याचे ३.५ गुण राहिले असून तो अन्य दोन खेळाडूंसह संयुक्तरीत्या १२व्या स्थानी आहे. कार्लसन ७.५ गुणांसह अग्रस्थानावर कायम आहे.

आशियाई स्पर्धेसाठी आनंद बुद्धिबळ संघाचा प्रेरक

नवी दिल्ली : एका तपानंतर बुद्धिबळ खेळाचे हँगझोऊ (चीन) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमन होणार असून, पाच वेळा जागतिक विजेता विश्वनाथन आनंद भारतीय संघाचा प्रेरक ही भूमिका सांभाळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणार असून, चार सुवर्णपदकांचे लक्ष्य ठेवत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने आनंदची नियुक्ती केली आहे. पुढील आठवडय़ात गुरुवारी आनंद खेळाडूंसमवेत पहिल्या सत्रात मार्गदर्शन करणार आहे. २०१०मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने दोन कांस्यपदके पटकावली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button