breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

T20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत-पाक महामुकाबला

T20 World Cup Schedule : यंदाच्या टी-२० विश्वचषकाची घोषणा करण्यात आली आहे.टी-२० विश्वचषकाचे सामने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. तर भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ९ जून रोजी होणार असून ही लढत या स्पर्धेतील मुख्य स्पर्धा असणार आहे. टीम इंडिया यावेळी ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार असून १ जूनपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

पाहुयात टी-२० विश्वचषकात कोणता संघ कोणत्या गटात :

Group A : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
Group B : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
Group C : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
Group D : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक :

लीग स्टेज सामने : १ ते १८ जून.
सुपर 8 सामने :१९ ते २४ जून.
उपांत्य फेरीचे सामने : २६ आणि २७ जून.
अंतिम सामना : २९ जून.

टीम इंडियाचे या विश्वचषक मालिकेतील सामने :

५ जून २०२४ : भारत विरुद्ध आयर्लंड
९ जून २०२४ : भारत विरुद्ध पाकिस्तान
१२ जून २०२४ : भारत विरुद्ध अमेरिका
१५ जून २०२४ : भारत विरुद्ध कॅनडा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button