Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

RR vs CSK Live Streaming : राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात? सामना किती वाजता?

RR vs CSK Live Streaming : आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे. 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात पहिल्या मोसमातील अंतिम फेरीतील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात होणार आहे. रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना सोमवारी 30 मार्चला होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

हेही वाचा –   उत्तम पचन, हाडंदेखील मजबूत राहावी यासाठी डाएटमध्ये फायबर-कॅल्शियमने समृद्ध ‘या’ फळांचा करा समावेश

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

राजस्थान-चेन्नईपैकी वरचढ कोण?

आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघ एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. एका विजयाचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबल आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयपीएल ट्रॉफीवर 5 वेळा नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला 31 पैकी 16 सामन्यांत पराभूत केलंय. तर राजस्थान रॉयल्सने 15 सामन्यात विजय मिळवला आहे.

धोनी 3 आठवडे आयपीएलला मुकणार!

दरम्यान सीएसकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून 2 नाही तर 3 आठवडे दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा धोनी चाहत्यांसाठी मोठा झटका समजला जात आहे. धोनीला 3 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार या शक्यतेमुळे त्याला किमान 5-6 सामन्यांना मुकावं लागू शकतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button