breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

रोहित शर्माचे वनडे-कसोटी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, मी पुढचा..

Rohit Sharma | भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन १७ वर्षांनी टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. त्याचबरोबर टीम इंडियाने ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण आता त्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटबद्दलही एक मोठे वक्तव्य केले आहे.

रोहित शर्मा अमेरिकेतील डलास येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. या कार्यक्रमात जेव्हा रोहितला त्याच्या भविष्याबद्दल विचारण्यात आलं. तो म्हणाला, मी आधीच सांगितले आहे की, मी फार पुढचा विचार करणारी व्यक्ती नाही. त्यामुळे येत्या काही काळासाठी तुम्ही मला खेळताना पाहाल हे स्पष्ट आहे, असं रोहित म्हणाला.

हेही वाचा     –      शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १०,००० रुपये; PM Kisan मध्ये मोठ्या बदलाची लवकरच होणार घोषणा! 

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना रोहित काय म्हणाला होता?

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. हा माझा शेवटचा सामनाही होता. जेव्हापासून मी खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून मी या फॉरमॅटचा आनंद लुटला आहे. त्यातला प्रत्येक क्षण मला आवडला असून मला हेच हवे होते. तसेच टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न होते, जे आता सत्यात उतरले आहे, असं रोहित शर्मा म्हणाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button