breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ऋषभ पंत आयपीएल मध्ये खेळणार? रिकी पाँटिंगची मोठी अपडेट

Rishabh Pant | भारताचा स्टार विकेटकिपर ऋषभ पंतच्या गाडीचा डिसेंबर २०२२ मध्ये अपघात झाला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून ऋषभ पंत हा क्रिकेटपासून दूर आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. यावरून दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच रिकी पाँटिंग यांनी मोठी अपडेट दिली आहे.

रिकी पाँटिंग म्हणाला की, ऋषभला आयपीएलसाठी पूर्णपणे फीट होईल असा विश्वास आहे. पण त्याची क्षमता किती असेल याबाबत माहिती नाही. सोशल मीडियावर तुम्ही त्याच्याबाबत बरंच काही बघितलं असेल. चांगला धावत आहे. पण पहिला सामना होण्यासाठी फक्त ६ आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे विकेटकीपिंग करेल की नाही याबाबत माहिती नाही. पण त्याला याबाबत विचारलं तर तो सांगेल की खेळणार, कीपिंग करणार आणि ४ नंबरवर फलंदाजी करणार त्याचा स्वभाव असाच आहे.

हेही वाचा     –    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिक भवन व म्युझियमचे भूमिपूजन 

ऋषभ पंत एक जबरदस्त खेळाडू आहे. खरं तर तो आमचा कर्णधार आहे. मागच्या वर्षी त्याची उणीव दिसून आली. त्याच्या १२-१३ महिन्यांचा प्रवास खरंच भयावह होता. तो स्वत:ला या बाबतीत नशिबवान समजतो. परत क्रिकेट खेळण्याची संधी मिळणं ही तर खूपच लांबची बाब आहे. आम्हाला आशा आहे की तो खेळताना दिसेल. प्रत्येक सामना खेळला नाही तरी चालेल पण कमीत कमी १० सामने खेळायला हवेत असं आम्हाला वाटत, असंही रिकी पाँटिंग म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button