breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘ऋषभ पंत आयपीएलमध्ये सामन्यावेळी उपस्थित असणार’; रिकी पाँटिंग

ऋषभ पंत हा दिल्ली संघाच्या ह्रद्याचा ठोका आहे

Ricky Ponting : भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यंदाची आयपीएल खेळू शकणार नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. दरम्यान, पंत हा संघाच्या ह्रद्याचा ठोका आहे आणि फ्रेंचायझीने त्याच्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत, त्यामुळे तो खेळणार नसला तरी देखील सामन्यावेळी उपस्थित असणार आहे, असं दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाला.

ऋषभ पंत हा फ्रेंचायझीचा ह्रद्य आणि आत्मा आहे. माझ्या आदर्श जगात पंत प्रत्येक सामन्यात माझ्यासोबत डगआउटमध्ये बसत असे, जर हे शक्य नसेल, तर आम्ही त्याला सर्व प्रकारे संघाचा भाग बनवू. आम्ही आमच्या टोप्या आणि टी-शर्टवर त्याचा नंबर लावू शकतो. आम्हाला एवढेच स्पष्ट करायचे आहे की पंत आमच्यासोबत नसला तरी तो आमच्यासोबत असून त्याच्याच नेतृत्वाखाली आम्ही खेळत आहोत असे सर्वांना वाटेल. ऋषभ पंत संघाचा प्रमुख असून तो कायमस्वरूपी कर्णधार असणार, असं रिकी पाँटिंग म्हणाला.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने डेव्हीड वॉर्नरला कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. दिल्ली संघाने वॉर्नरला ६.२५ कोटी रूपयांना विकत घेतलं आहे. दुखापतग्रस्त पंतच्या जागी वॉर्नर संघाची धुरा संभाळणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दिल्लीचा पहिला सामना १ एप्रिलला लखनऊ सुपरजायंट्सविरूद्ध खेळला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button