क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय
प्रो लीग हॉकी (पुरुष) : भारताचे न्यूझीलंड, स्पेनशी सामने
![Pro League Hockey (Men): India's matches against New Zealand, Spain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/hockey-sti.jpg)
पीटीआय, भुवनेश्वर | भारतीय पुरुष हॉकी संघ नव्या ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी हंगामाचा प्रारंभ न्यूझीलंड आणि स्पेनविरुद्ध लढतींनी करणार आहे, अशी माहिती गुरुवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) दिली. भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड आणि स्पेनविरुद्धचे पहिले सामने अनुक्रमे २८ आणि ३० ऑक्टोबरला खेळणार आहे, तर परतीचे सामने अनुक्रमे ४ आणि ६ ऑक्टोबरला खेळणार आहे. याचदरम्यान न्यूझीलंड आणि स्पेनचे संघ एकमेकांविरुद्धही सामने खेळणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतीय संघ जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारताचे जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाशी पहिले सामने अनुक्रमे १० आणि १२ मार्चला होतील, तर परतीचे सामने अनुक्रमे १३ आणि १५ मार्चला होतील.