breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Olympic Tokyo :नीरज चोप्रा भालाफेकमध्ये पहिल्याच प्रयत्नात यशस्वी, अंतिम फेरीत धडक

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज बुधवारी (दि.०४) झालेल्या अ गटातील पात्रता फेरीत नीरज चोप्राने जोरदार कामगिरी केली. यामुळे तो अंतिम फेरीत खेळणार आहे. त्याने केलेल्या कामगिरीनुसार ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार तो थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे.

नीरज चोप्राने पात्रता फेरीत तब्बल ८६.६५ मीटर इतका लांब भाला फेकला. पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १२ खेळाडुंची अंतिम फेरीत निवड होते.अ गटामध्ये नीरज १५ व्या स्थानावर भाला फेकण्यासाठी आला होता. निरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

निरज पाठोपाठ फिनलॅण्डच्या लेस्सी इतिलातोलोनेही ८३.५० च्या पुढे भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.मात्र हे उत्तम १२ खेळाडू गट अ आणि ब मधून एकत्रितपणे निवडले जातात. ब गटामधील स्पर्धा अजून बाकी आहे.तसेच अ गटामधील काही स्पर्धकही अजून शिल्लक आहेत.

मात्र नीरज चोप्राला थेट अंतिम फेरीत पोहोचल्याने त्या ब गटाची कोणतीही चिंता असणार नाही.नीरजने पहिल्या नियमानुसार लांब भाला फेकल्याने त्याचे अंतिम फेरीत स्थान पक्क झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button