breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात भन्नाट कॅच ; पाहा व्हिडीओ

गांधीनगर – आयपीएल हंगामातील 21 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. गोलंदाजांनी केलेल्या चकमदार कामगिरीमुळे आणि त्यानंतर कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने विजय मिळवला आहे. सामना जरी पंजाब किंग्जने हारला असला तरी पंजाबच्या रवी बिश्नोईने भन्नाट झेेल पकडत सर्वांची मनं जिकंली आहे.

अर्शदीप सिंग त्याचं तिसरं षटक घेऊन आला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुनिल नारायणने मिड विकेटच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण रवी बिष्णोईने धावत येऊन चेंडूवर झडप टाकली. त्याच्या या झेलवर सर्वच थक्क झाले. त्याने 26 मीटरची धाव घेतली आणि चेंडू पकडला होता. 4 चेंडूमध्ये शून्य धावा करून सुनिल नारायण बाद झाला. पंजाबने हा सामना गमावला, पण पंजाबला या सामन्यात एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लाभला आहे.

मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय घेतलेला सार्थ ठरवत कोलकाताच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केला. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यासोबतच कमिन्स, सुनिल नारायण यांनी 2 तर शिमव मावी आणि वरूण चक्रवर्ती यांनी 1 गडी बाद करत पंजाबला 20 षटकात 9 बाद 123 धावा करता आल्या. फलंदाजीला आलेल्या कोलकाताचीही सुरूवात निराशाजनक झाली. राणा आणि गिल झटपट बाद झाले. त्यापाठोपाठ नारायणही बाद झाला.

दरम्यान, सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार असं वाटत असताना मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने भागीदारी रचली. त्यानंतर राहुल बाद झाला आणि लगेच रसेलही धावबाद झाला. शेवटी दिनेश कार्तिक आणि मॉर्गनने आक्रमक फटकेबाजी करत 17 व्या षटकात सामना जिंकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button