breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

मिताली राज ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सने १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. परंतु मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करण्याचा बहुमानदेखील मिताली लवकरच मिळवेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. दरम्यान, सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे, याबाबत बीसीसीआयने ट्विट करून मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा :-IND vs ENG 1st T20 :आज भारत आणि इंग्लंड विरुद्ध पहिला टी 20 सामना

दरम्यान, १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने, तर तब्बल ८२ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. क्रिकेटच्या इतिहासात मिताली ही सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच २००हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button