केएल राहुलचे रेकॉर्डब्रेक शतक! अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
![KL Rahul's second spell in South Africa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/K-L-Rahul-780x470.jpg)
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. या कसोटी मालिकेत केएल राहुलने दमदार खेळी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत केएल राहुलचे हे दुसरे शकत आहे. या शतकी खेळीच्या जोरावरच भारताने सेंच्युरियनच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर २४५ धावांपर्यंत मजल मारली.
असा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडु केएल राहुल
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार खेळी करत शतक झळकावले. सेंच्युरियनमध्ये त्याने १३७ चेंडूत ७३.७२ च्या स्ट्राईक रेटने १०१ धावा केल्या. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ४ षटकारही मारले. यासह तो द. आफ्रिकेच्या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.
हेही वाचा – मुलींवरील अत्याचार, आत्महत्यांसाठी पालकही जबाबदार; रूपाली चाकणकर
A magnificent CENTURY for @klrahul 👏👏
He's stood rock solid for #TeamIndia as he brings up his 8th Test 💯
His second Test century in South Africa.#SAvIND pic.twitter.com/lQhNuUmRHi
— BCCI (@BCCI) December 27, 2023
राहुलची कसोटीतील कामगिरी :
केएल राहुलने २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४८ कसोटी सामन्यांच्या ८२ डावांमध्ये २,७४३ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ३४.२९ आणि स्ट्राइक रेट ५२.२२ राहिली आहे. कसोटीत त्याने १३ अर्धशतके आणि ८ शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १९९ आहे.