breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
#IPL2021 आज कॅप्टन कूल धोनीसमोर पंजाबचे आव्हान
![# IPL2021 Punjab's challenge in front of Captain Kool Dhoni today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Untitled_design.png)
मुंबई – आज आयपीएलच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना रंगणार आहे. कॅप्टन कूल धोनीला पहिल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तर मागील रोमांचक सामन्यात पंजाबने राजस्थानला हरवलं होतं. त्यामुळे आज चेन्नई आपला पहिला विजय मिळणार की पंजाब आपला दुसरा विजय साजरा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना होणार आहे.
आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सर्व सामन्यांचा विचार करायचा झाला तर चेन्नई विरुद्ध पंजाब आजवर म्हणजेच 2008 ते 2020 पर्यंत 23 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी 14 सामने जिंकण्यात चेन्नईला यश आले आहे. आजच्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल. तसेच तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता.