#IPL2021 दिल्ली कॅपिटल्सला धक्का; आर अश्चिनचा घरी परतण्याचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/2020-10-27-9.jpg)
नवी दिल्ली – आयपीएल २०२१ची लढत दिवसेंदिवस रोमांचक होत आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. आर.अश्विनचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक कोरोनाशी लढत आहेत. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी कुटुंबासोबत राहणे योग्य असल्याचे म्हणत आर.अश्विनने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनने त्याच्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे.
‘यावर्षीच्या आयपीएलमधून मी उद्यापासून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोनाविरोधात लढा देत आहे. या कठीण काळात मला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे’, असे अश्विनने ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच कुटुंबीय संकटातून बाहेर पडल्यानंतर आयपीएलमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अश्विनने म्हटले आहे.
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals 🙏🙏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 25, 2021
त्याचबरोबर आर अश्विनच्या या निर्णयावर दिल्ली कॅपिटल्सने प्रतिक्रिया दिली असून त्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करत संकटाच्या या काळात आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
🚨 UPDATE 🚨
Ravichandran Ashwin has decided to take a break from #IPL2021 to support his family in the fight against #COVID19, with the option to return should things get better.
We at Delhi Capitals extend him our full support 💙#YehHaiNayiDilli pic.twitter.com/A9BFoPkz7b
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021
दरम्यान, आर अश्विनने आपल्या १० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७७ कसोटी, १११ एकदिवसीय आणि ४६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ४०६ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. क्रिकेट इतिहासात आतापर्यंत फक्त १६ गोलंदाजांनी हा विक्रम केला असून त्यामध्ये अश्विनचाही समावेश आहे.