Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2026 : 19 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? जाणून घ्या

IPL 2026 : आयपीएलच्या 19 व्या मोसमाची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. बीसीसीआयने 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मार्च रोजी फक्त पहिल्या 20 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक हे विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर केलं जाईल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. मात्र त्यानंतरही उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांची प्रतिक्षा कायम आहे.

आयपीएलच्या 18 व्या हंगामात 74 सामने खेळवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही तितकेच सामने होणार का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाही 74 सामन्यांचाच थरार रंगणार आहे. तसेच 20 सामन्यांचं आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. अशात आता उर्वरित सामन्यांच्या तारखा या 28 मार्च किंवा त्यानंतर जाहीर करण्यात येऊ शकतात.

बीसीसीआय यंदा सामन्यांची संख्या वाढवून 80 करु शकते, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात काही दिवसांपासून सुरु होती. मात्र क्रिकबझनुसार असं काही होणार नाहीय. रिपोर्ट्सनुसार, उर्वरित 54 सामन्यांचं वेळापत्रक हे 26 मार्चपासून जाहीर करण्यात येऊ शकतं.

हेही वाचा –  न्हाळ्यातही तुमचा चेहरा उजळेल, रोज ‘या’ 6 हंगामी फळांचा आणि भाज्यांचे करा सेवन

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमादरम्यान विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. त्यानुसार 4 राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम या निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये 19 व्या मोसमातील सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या राज्यात संबंधित दिवशी मतदान होणार तेव्हा तिथे सामने होणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

चेन्नई (23 एप्रिल), कोलकाता (23 आणि 29 एप्रिल) आणि गुवाहाटी (9 एप्रिलला) मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. वरील तारखांना संबंधित ठिकाणी सामने होणार नाहीत.

नियमानुसार, प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानात निम्मे सामने खेळते. आता 19 व्या मोसमातील पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. राजस्थानचे त्यापैकी 3 सामने हे आसाममधील गुवाहाटीत होणार आहेत. राजस्थानचे एकूण 2 होम ग्राउंड आहेत. त्यामुळे राजस्थानला गुवाहाटी व्यतिरिक्त मोसमातील उर्वरित सामने जयपूरमध्ये खेळण्याची संधी मिळणार का? याचीही चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button