breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : चेन्नईला आज जिंकावेच लागेल; समोर हैदराबादचे आव्हान

दुबई – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळवून ते दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना दमदार सुरुवात करणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हैदराबादविरुद्धच्या मागील लढतीत चेन्नईला सात धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

आयपीएलच्या इतिहासात असे कधीच घडले नाही की चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK नेहमीच पहिल्या चारमध्ये असतो. मात्र यावेळी ही गोष्टी अवघड दिसत आहे. चेन्नईला आतापर्यंत ७ पैकी फक्त २ सामन्यात विजय मिळवता आला असून आता यापुढील ७ पैकी किमान ५ मध्ये चेन्नईला विजय मिळवावा लागले.

धोनीने गेल्या सामन्यात बेंगळुरूविरुद्ध पराभव झाल्यानंतर मान्य केले होते की, फलंदाजी योग्य प्रकारे होत नाही. त्यात तातडीने बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात काही बदल होतो का हे पाहणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा चेन्नईकडून शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला धावसंख्या करता आलेल्या नाहीत. आघाडीच्या फलंदाजांमध्ये अंबाती रायडू पहिल्या सामन्यात खेळला. त्यानंतर तो ही धावा करू शकला नाही. केदार जाधव अपयशी ठरला म्हणून एन जगदीशनला संधी दिली पण तोही वेगाने खेळू शकला नाही. तर धोनी, रविंद्र जडेजा आणि ब्राव्हो यांनादेखील अपेक्षेप्रमाणे खेळता आले नाही. या सर्व अडचणीतून चेन्नईला मार्ग काढावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button