IPL आर्थिक संकटाचे सावट: विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसमध्ये कपात
इंडियन प्रीमियर लीगवर सुध्दा आर्थिक संकटाचे सावट पहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने येत्या 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या खर्चात कपात केली आहे. तसंच विजेत्या संघ आणि उप-विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत सुध्दा कपात केली आहे.
2019 च्या तलनेत या वर्षी बक्षिसाची रक्कम अर्ध्यावर ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएलच्या विजेत्या संघाला मागच्या वर्षी 20 कोटी बक्षीस देण्यात आले होते. यावर्षी त्यांना बक्षीस म्हणून फक्त 10 कोटीच देण्यात येणार आहे.
आयपीएलच्या सर्व संघांना परिपत्रक पाठवत बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, ‘आयपीएलच्या विजेत्या संघाला 20 कोटींऐवजी आता फक्त 10 कोटी दिले जाणार आहेत. तसंच बीसीसीआयने पुढे असे देखील सांगितले आहे की, वित्तीय पुरस्काराच्या रकमेत बदल करण्यात आला आहे. विजेत्या संघाला 20 कोटींऐवजी 10 कोटी देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला 12 कोटी 50 लाखांऐवजी 6 कोटी 25 लाख रुपये देण्यात येणार आहे. पात्रता फेरीत पराभूत झालेल्या दोन संघाला प्रत्येकी 4 कोटी 37 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहे.